महिला अत्याचारांवर पंतप्रधानांचे मौन का? – राहुल गांधी

रायपूर – देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणा-या अत्याचार आणि बलात्कार गंभीर घटना घडत आहे. पण पंतप्रधान यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दांत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला. मी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटले की ते माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकत नाहीत. तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले. हे तुम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिलेच असेल. कारण ते चौकीदार नाही तर भागीदार बनले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, जेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुलींवर अत्याचार होतो. तेव्हा मोदींच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. भाजपाशासित राज्यांतच महिलांवर बलात्कार का होत आहे, हा प्रश्न तुमच्याच नव्हे तर संपूर्ण देशभरातील महिलांना पडला आहे. मागील 4 वर्षांत महिलांवर जेवढे अत्याचार झाले, ते 3000 वर्षांत कधी झाले नव्हते.

-Ads-

तुम्ही देशाला खोटे का सांगितले असे मी संरक्षण मंत्र्यांना संसदेत विचारले, पण मला उत्तर मिळाले नाही. मी मोदींना जेव्हा विचारले, तेव्हा ते माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकले नाहीत. हे सर्वांनी टीव्हीवर पाहिले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले, त्यांना शिक्षा झाली. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये आले तरी त्याची साधी चौकशीही सुरू केलेली नाही. ते देशाचे नव्हे तर भाजपा आणि एनडीएचे चौकीदार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)