महिलाभिमुख शहरासाठी भरीव तरतूद करावी

खासदार चव्हाण यांची महापालिकेकडे मागणी

पुणे – आगामी आर्थिक वर्षांच्या (2019-20) च्या अंदाजपत्रकात महापालिकेने महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी भरघोस तरतूद करावी, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. त्यासाठी पुणे शहर महिलांसाठी अधिक सुरखित व्हावे, यासाठी विशेष कृती आराखडा करावा अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांनी 2013-14 मध्ये तयार केलेल्या महिलांसाठी सुरक्षित शहर अहवालातील मुद्दे आणि शिफारशी पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने नुकतीच आयुक्त सौरव राव यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. याला राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, नगरसेविका सुरेखा कवडे, मीनल सरवदे, मनाली भिलारे, प्रीती करमरकर यांच्यासह आजी-माजी नगरसेविका आणि इतर सामाजिक संस्थेतील प्रतिनिधी उपस्थित होते. या अहवालाचा पाठपुरावा व अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुढील आराखडा आखण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर महानगरपालिकेच्या 2019-20 च्या अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने व आपले शहर महिलाभिमुख होण्यासाठी आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांना देण्यात आली.

शहरात काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी प्रत्येक प्रभागात पाळणाघरे व्हावीत, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचे बांधकाम, देखभाल व दुरुस्ती होण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी मागणी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)