“महिलांसाठी भारत सर्वात धोकादायक देश’

सर्वेक्षणातील निष्कर्श 

लंडन – महिलांसाठी भारत हा जगात सर्वात धोकादायक देश आहे, असा दावा जागतिक तज्ज्ञांच्या मतांवर आधारीत सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे. भारतात महिलांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण करण्यात येत असून त्यांच्याकडून बळजबरीने कामे करून घेतली जातात, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनने केलेल्या या सर्वेक्षणानुसार, युद्धग्रस्त अफगाणिस्तान आणि सीरिया भारतानंतर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. यानंतर सोमालिया आणि सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या 550 तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

पाश्‍चिमात्य देशांचा विचार करता महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचारांच्या बाबतीत अमेरिका हा एकमेव देश होता. या देशाचा समावेश सध्या टॉप 10 मध्ये आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्यातारासंदर्भात अमेरिकेला संयुक्तपणे तिसरे स्थान देण्यात आले आहे.

यापूर्वी 2011 मध्ये देखील अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात अफगाणिस्तान, कांगो, पाकिस्तान, भारत आणि सोमालिया हे देश महिलांसाठी सर्वात धोकादायक असल्याचे म्हटले होते.

भारतात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न केले जात नाहीत, आणि याच प्रमुख कारणामुळे भारत धोकादायक देशांच्या सर्वात वरच्या स्थानी पोहोचला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीत 5 वर्षांपूर्वी झालेल्या विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि खून प्रकरणानंतर राष्ट्रीय स्तरावर निदर्शने झाल्यानंतर देखील परिस्थितीत बदल झालेला नाही असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)