महिलांसाठी खास फेसबुक सुरक्षा टिप्स…

तब्बल 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची जबाबदारी फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गनं यानं घेतली असून कंपनीची चूक मान्य केली आहे. त्याचबरोबर, फेसबुक युजर्सना अकाउंटच्या सुरक्षेबद्दल काही टिप्सही दिल्या आहेत. कोणत्या आहेत या टिप्स जाणून घेऊया…

फोन नंबर काढा

फेसबुक अकाउंटवर तुमचा फोन नंबर असेल तर तो लगेच काढून टाका. कारण, या नंबरचा गैरवापर होऊ शकतो. एखाद्याला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तो मेसेंजरची मदत घेऊ शकतो. यापूर्वी फेसबुक रजिस्ट्रेशनसाठी फोन नंबर मागितला जायचा, आता त्याची गरज नाही.

जन्मतारिख काढा

फेसबुकवर जन्मतारीख ठेवण्याची गरज नाही. तुमच्या जन्मतारखेचा वापर करून हॅकर्स अनेक प्रकारची माहिती मिळवू शकतात. त्यामुळं जन्मतारीख काढून टाका.

ठावठिकाणा सांगू नका

पिकनिकसाठी वा कार्यालयीन कामासाठी घराबाहेर जाताना त्याबद्दलची माहिती मित्रांना देण्याचा मोह आपल्याला टाळता येत नाही. या मोहापायी आपण कुठं जात आहोत, किती दिवसासाठी जाणार आहोत, काय करणार आहोत, ही माहिती फेसबुकवर सहज टाकतो. हे टाळा. कारण यामुळं तुम्ही कुठं जाणार आहात हे सर्वांना कळतं. त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. विमानतळ तसंच, सुट्टीच्या ठिकाणांचे फोटो टाकण्याचं टाळा. विशेषत: घराबाहेर असल्याची माहिती देणं टाळा. अन्यथा, तुमच्या गैरहजेरीत तुमच्या घरी चोरी होण्याचा धोका असतो.

पार्टी फोटोज नकोत

अनेकदा आपण पबमधील किंवा एखाद्या पार्टीत मद्यपान केल्याचे फोटो फेसबुकवर टाकतो. प्रायव्हसी सेटिंग हॅक करून एखादी व्यक्ती हे खासगी फोटो शेअर करू शकते. हे फोटो तुमच्या कुटुंबीयांनी पाहिल्यास कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. शिवाय, कंपन्या सध्या नोकरी देण्याआधी उमेदवाराचं सोशल अकाउंट तपासतात. त्यामुळं असे फोटो अपलोड करणं टाळा.

बॉसला अनफ्रेंड करा

बॉसला फ्रेंडलिस्टमध्ये ठेवू नका. कारण, तुम्ही मांडलेल्या परखड मतांमुळं वा वैयक्तिक विचारांमुळं तो नाराज होऊ शकतो. त्यामुळं तुमची नोकरीही जाऊ शकते. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं फेसबुकच्या बाबतीत बॉसपासून सुरक्षित अंतर ठेवणं कधीही चांगलं.

रिलेशनशिपची काळजी घ्या

माजी प्रियकर वा प्रेयसीचा फोटो फेसबुकवरून हटविणं कधीही चांगलं. या फोटोंमुळं तुमच्या भावी जीवनात वादळं येऊ शकतात. विशेषत: ऍरेंज मॅरेजच्या वेळी अडचणी निर्माण होऊ शकतात.

वादग्रस्त पोस्टवर प्रतिक्रिया नकोत

ज्या कोणत्या पोस्टस तुम्हाला आक्षेपार्ह, वादग्रस्त, कलह वाढवणाऱ्या अथवा अश्‍लील वाटतील, अशा पोस्टच्या वाटेला जाऊ नका. अशा पोस्ट लाईक-शेअर करु नका. त्यावर कसलीही प्रतिक्रिया देणे टाळा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)