महिलांविषयी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल निलंबित !

नवी दिल्ली: कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली जात असून हार्दिक पांड्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी देखिल मागितली होती. मात्र, पांड्याने दिलेल्या उत्तरावर समाधानी न झालेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी त्या दोघांवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासकीय समीती समोर ठेवला होता.

दरम्यान, कमेटी ऑफ एडमिनिस्‍ट्रेटर्स प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना महिलांविषयी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने कॉफी वीथ करन या कार्यक्रमात जास्तच मनमोकळ्या गप्पा मारताना महिलांबद्दल अपमानजनक विधान केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही पांड्यासह राहुलला बाजू मांडण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. पांड्याने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही आणि या दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव मी ठेवतो. अंतिम निर्णय हा डायना एडुल्जीशी चर्चा केल्यानंतर घेण्यात येईल. डायना या संदर्भात कायदेशीर सल्ला घेत आहेत.

त्यामुळे त्यांच्या मतानंतर अखेरचा निर्णय घेण्यात येईल, असे विनोद राय यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एडुल्जी यांनीही दोघांवर बंदीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

क्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे नाते काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत क्रिकेटपटूंनी यात योग्य तो समन्वय राखला होता आणि आपण देशाचे प्रतिनिधित्व करतो, याची जाण त्यांना होती. अशा प्रकारची विधाने करणे हे स्विकारण्यासारखे नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूनेही 70च्या दशकात असे विधान केले होते आणि त्यासाठी त्यांना एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती,” असे एडुल्जी यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते.

मात्र, या संदर्भात पांड्यानेही बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. बीसीसीआयच्या नोटिसीला उत्तर देत तो म्हणाला की, हा कार्यक्रम दिलखुलास गप्पांचा होता आणि त्या ओघात मी विधान करून गेलो. त्या विधानाचं गांभीर्य मला नंतर समजले. माझी चूक मला कळाली आणि मी बीसीसीआयची मनापासून माफी मागतो. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचीही मी माफी मागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)