महिलांवरील अत्याचारविरोधी कायद्यांची अंमलबजावणी होतेय का?

सुप्रिया सुळे: पंतप्रधान मोदींनी मौन सोडावे
मुंबई – महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. पण, त्या कायद्यांची अंमलबजावणी होतेय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून बोलावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हरियाणात एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या प्रकरणाचा संदर्भ देऊन सुप्रिया यांनी एक निवेदन जारी केले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ याविषयी बोलणाऱ्या मोदींकडे एक महिला या नात्याने मी न्यायाची मागणी करते, असे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीचा आधार घेऊन त्यांनी राज्यातील बेपत्ता मुलींची संख्या 3 हजार असल्याकडे लक्ष वेधले. त्याचवेळी भाजपचे आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. भाजपचा एक आमदार जाहीरपणे मुली पळवण्याची भाषा करतो. मात्र, गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री मौन बाळगतात, असे सुप्रिया यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)