महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श घ्यावा : गंगावणे

सातारा – सावित्रीबाईंच्या या जिल्ह्यात त्यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमास जमलेल्या महिलांनी सावित्रिबाईंचा शिक्षण आणि इतर सामाजिक सुधारणांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन ‘छत्रपती संभाजी’ या मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी येथे केले.

लेक लाडकी अभियानातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभियानाच्या संचालिका ऍड. वर्षा देशपांडे, दलित महिला मंडळाच्या अध्यक्षा ऍड. शैला जाधव प्रमुख उपस्थित होत्या. शाहू कला मंदिरात हा कार्यक्रम झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

498 अ कलमाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यशस्वी लढा देणाऱ्या नगर येथील न्यायाधार संस्थेच्या सात महिला वकील कार्यकर्त्यांना सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार 2019 याने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व सात हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऍड. मंदाकिनी चन्ना, ऍड. निर्मला चौधरी, ऍड माया सोसे, ऍड. नीलिमा भणगे, ऍड. विजया काकडे, ऍड. नीलिमा बंडेलू, ऍड. स्मिता मुरुमकर या महिला वकीलांनी हा सन्मान स्विकारला. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नींचा ‘वीर माता’ म्हणून पाठिंबा दर्शक गौरव करण्यात आला.

या पुरस्काराबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामान्यातील असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या नीता ढाकणे, नीलिमा पटवर्धन, डॉ. मंजुश्री पटवर्धन, दीपेंती चिकणे, रोहन यादव, कल्पना लोखंडे, वनिता वाटांबळे, मालन जावळे, रखमा बोडरे, सुमन यादव, सुलभा कांबळे व सुमती पंडितराव यांना सावित्रीबाई फुले सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गंगावणे यांनी ऍड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, न्यायाधार ही संस्था नगर जिल्ह्यात काम करते.

498 अ कलमाचा महिला दुरुपयोग करतात असं कारण पुढे करत केलेल्या याचिकांवर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ अटक न करण्याचे आदेश दिले होते. त्या निर्णयाविरोधात ‘न्यायाधार’च्या 7 महिला वकील सर्वोच्च न्यायालयात गेल्या. त्या कायद्याच्या लढाईत सर्वोच्च न्यायालयाने 498 अ कलम पूर्ववत काम करा असे आदेश दिले.

राजीव मुळे लिखित व दिग्दर्शित ‘टरफल’ आणि कैलास जाधव लिखीत व दिग्दर्शित फाईव्ह डब्ल्यू वन एच’ या बहुचर्चित एकांकिकांना उपस्थितांनी दाद दिली. प्रा. संजीव बोंडे, जनार्दन घाडगे गुरुजी, ऍड. वनराज पवार व विविध गावांतून आलेल्या महिला मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)