महिलांनी घेतले कायदे व अधिकाराविषयी मार्गदर्शन

कराड – महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या संयुक्तविद्यमाने कराड येथे आयोजित महिलांसाठी कायदे व अधिकाराबाबत जागरुकता विषयी एकदिवशी कार्यशाळेत महिलांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांसह आपल्या अधिकाराविषयी मार्गदर्शन घेतले.

कराड येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिलांसाठी कायदे व अधिकाराबाबत जागरूकता कार्यशाळेचे उद्‌घाटन सभापती फरिदा इनामदार यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेसाठी बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, अतिष शिंदे, आनंदा शिंदे, ऍड. मनिषा बर्गे, सविता पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण, आनंदा थोरात, तालुका समन्वयक निलेश पवार, शहर तांत्रिक तज्ञ गणेश जाधव, क्षेत्रीय समन्वयक अनिता सुतार, धनंजय धामणे यांची उपस्थिती होती.

महिलांनी स्वतःमधील क्षमतांचा वापर करून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. तरीही ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यांनी निर्भय बनावे, अन्याय, अत्याचाराविरोधात दाद मागावी. कायदेविषयक मार्गदर्शन घ्यावे, असा मोलाचा सल्ला सभापती फरिदा इनामदार यांनी दिला.

संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी प्रास्ताविकात महिलांसाठी कायदे व अधिकार कार्यशाळा आयोजनाचा हेतू सांगितला. सर्व महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मृणाल गरुड, रती भिसे, सुवर्णा सुर्वे, अवधुत माने यांनी स्वागत केले. स्नेहल राजहंस व स्वाती खडंग यांनी सुत्रसंचालन केले. अर्चना पाटील यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)