महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे – डॉ. घोलप

आळेफाटा- आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. रश्‍मी घोलप यांनी व्यक्त केले. रोटरी क्‍लब ऑफ आळेफाटा आणि महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आळे (ता. जुन्नर) येथे बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य मार्गदर्शन शिबिर व करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नयना डोके होत्या. यावेळी नेताजी डोके, उल्हास सहाणे, किशोर कुऱ्हाडे, जी. एल. गुंजाळ, प्राचार्य डॉ .वाडेकर, अरुणा वाघोले, मनीषा गिरी उपस्थित होते. यावेळी अमोल चंगेडिया यांनी करियर मार्गदर्शन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वाडेकर यांनी केले, सूत्रसंचालन एन. पी. जोशी आणि एन. आर. हुलवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन केशव बोरकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)