महिलांना स्तनपानाबाबत जागरुक राहावे

मंचर-महिलांनी चूल आणि मूल संभाळताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हिमोग्लोबीन ही समस्या महिलांमध्ये तिव्रतेने जाणवते.गरोदर महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. नियमितपणे सकस आहार आणि व्यायाम करून होणाऱ्या बाळाला सदृढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. कुपोषित बाळ होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन इर्नरव्हिल क्‍लब ऑफ मंचरच्या डॉ. स्नेहल गुजराथी यांनी केले. इर्नरव्हिल क्‍लब ऑफ मंचरच्या वतीने स्तनपान बालकांचा हक्‍क या पुस्तिकेचे वाटप केले. गरोदरपणातच महिलेने स्तनपानाबद्दल जागरूक राहण्यासाठी 1000 पुस्तिकेचे वाटप मंचर उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी क्‍लबच्या अध्यक्षा शारदा पटेल, तारा पोकार, दिपा पाटील, मंगल चिखले, डॉ. सुचेता शेटे उपस्थित होत्या. मंचर उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सीमा देशमुख यांच्याहस्ते पुस्तक प्रदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. संजय भवारी, प्रतिभा कहडणे उपस्थित होत्या. स्तनपानाबद्दल महिलांना डॉ. गुजराथी यांनी सखोल मार्गदर्शन केले. स्तनपान आणि गरोदरपणात महिलांनी घ्यावयाची काळजी या याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. मथुरा शेटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)