महिलांना कायद्याची माहिती असणे आवश्‍यक : ऍड. बाणखेले

मंचर- कायद्याचे ज्ञान प्रत्येक स्त्रीला असणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण तसेच घरेलू हिंसा व त्यांचे कायदे माहित असणे आवश्‍यक आहे, असे मत ऍड. संध्या बाणखेले यांनी व्यक्त केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी व इन्हरव्हील क्‍लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन मुलींसाठी लैगिंक शोषण, प्रकार व त्यासंबधित कायदे या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ऍड. संध्या बाणखेले यांनी कायदेविषयक सविस्तर माहिती दिली. डॉ. मधुरा शेटे व डॉ. सुचेता शेटे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्राध्यापिका हर्षिता राक्षे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी डॉ. स्नेहल गुजराथी, डॉ. मृणाल टाके, शारदा पटेल, स्वाती फुलडाळे, दीपा पाटील आदी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)