महिलांच्या रोजगारासाठी प्रभावी योजना राबविणार

पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव : शिवरीमध्ये महिलांना गॅस कनेक्‍शनचे वाटप

खळद- पुरंदर तालुक्‍याच्या सभापतीपदाची संधी मला मिळाल्यानंतर तालुक्‍यातील महिलांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याचाच विचार करून महिलांच्या रोजगारासाठी प्रभावी योजना राबविणार असल्याचे पुरंदर पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव यांनी सांगितले.
शिवरी (ता. पुरंदर) येथे पंतप्रधान उज्वला गॅस योजने अंतर्गत येथील 27 लाभार्थी महिलांना गॅस कनेक्‍शन व 30 महिलांना आयुष्यमान भारत योजने अंतर्गत विमा पॉलिसीचे वाटप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कैलास जगताप, शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी गणेश मुळीक, माजी सरपंच बाळासाहेब लिंभोरे, कोमल लिंभोरे, सरपंच नीलगंगा कामथे, सुनील कामथे, धनंजय कामथे, नवनाथ गायकवाड, किशोर लिंभोरे, तुकाराम कांबळे, नितीन होले यांच्यासह शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
कैलास जगताप यांनी विविध शासकीय योजनांची माहिती सांगितली व गणेश मुळीक यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून शिवरीत जास्तीत जास्त विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आधारकार्ड, पीक विमा, शिलाई मशीन, पीठ गिरणी, शेती अवजारे, अपघातग्रस्तांना मदत, गोपीनाथ मुंडे अपघात वीमा योजनेचा लाभ, रेशनकार्ड आदी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक राजाभाऊ क्षीरसागर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कामथे यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)