महिलांच्या पुढाकारामुळे ‘हे’ गाव दारूमुक्तीच्या उंबरठ्यावर

लहान येथील दारू दुकान बंद करण्यासाठी महिला स्वाक्षरांची पडताळणी पडली पार

नांदेड – अर्धापूर तालुक्‍यातील लहान येथील देशी दारूचे दुकाण बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून दारु बंदीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना 14 जून रोजी स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले होते. त्यानंतर 17 जुलै रोजी जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क कार्यालयावर महिलांनी मोर्चाही नेला होता. दारुबंदी साठी सरसावलेल्या महिलांची जिद्द पाहून कायदेशीर बाब पुर्ण करण्यासाठी उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सोमवारी लहान येथे निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी केली. या वेळी 70% महिलांनी महालक्ष्मीच्या सणाची रेलचेल असतांनाही सोमवारी स्वाक्षरी पडताळणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर आपले ओळखपत्र दाखवून दारुबंदी झालीच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशा घोषणा देत स्वाक्षऱ्यांची ओळख पटवून दिली. महिलांच्या पुढाकारामुळे प्रशासनानेही दखल घेतल्याने लहान हे गाव आता दारूबंदीच्या उंबरठ्यावर उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. लवकर या गावातील दारू हद्दपार झालेली असेल असा विश्‍वास या गावातील महिलांना आहे.

लहान येथील देशी दारू दुकानांमुळे गांवातील तरुण व अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहेत तर अनेक कुटुंब या मुळे उध्वस्त झाले असल्याने हे दुकाण बंद करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना गांवक-यांनी सहकार्य केले आहे. स्वाक्षरी पडताळणीनंतर गरज वाटल्यास पुढचा टप्पा हा दारुचे दुकान बंद करण्यासाठी मतदानाचा असून यासाठी दिनंक व वेळ निश्‍चित होईल.

स्वाक्षरी पडताळणीसाठी निरिक्षक म्हणून उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिकारी एस.व्ही.पाटील, एस.एस.खंडेराय, डी.एन.चिलवतकर, ए.व्ही.मुळे, आर.एस.कोतवाल, विस्तार अधिकारी (पं.स) कैलास गायकवाड हे उपस्थित होते. त्यांना सरपंच शोभाताई रणखांब, उपसरपंच सतिश लहानकर, ग्रा.वि. अधिकारी राजेश भुरे, तलाठी मोरे, जमादार कृष्णा काळे, ग्रा.पं.सदस्या अनुराधाबाई इंगळे,विशाखा लोणे, लक्ष्मीबाई बोक्‍से, नसरीन सैयद, तंटा मुक्ति अध्यक्ष सुभाष देशमुख, माजी सरपंच सुधाकर इंगळे, एल.बी. रणखांब, आशोक सावंत, बाबुराव हरण, बाबासाहेब सावंत, अमोल पाटील इंगळे, शेख महेबूब, सदाशिव पाटील इंगळे, साहेबराव सुर्यवंशी, राजू लोणे, शिवदास धारकर, मंगेश कु-हाडे, प्रभाकर आंबेकर, कोंडिबा दळवी, शेख हुसेन, बबन बोक्‍से, प्रभाकर बादलवाड, गणेश पांचाळ, विजय शेळके, अनिल सेवाळे यांनी पथकास सहकार्य केले. या वेळी स्वाक्षरी पडताळणीसाठी महिलांनी रांगाच रांगा लावल्या होत्या.

महिलांच्या पुढाकारामुळे प्रशासनानेही दखल घेतल्याने लहान हे गाव आता दारूबंदीच्या वाडेवर स्वार होणार आहे. लहान गावातील महिलांचा आदर्श सर्व गावांनी घेत जिलह्यात दारू हद्दपार करावयास हवी. जिल्ह्यातील दारू हद्दपार करण्यासाठी आता सर्वच गावातील महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)