महिलांच्या ड्रेस कोड संदर्भातील निर्णय मागे घ्यावा अन्यथा अध्यक्षाना चोपणार- तृप्ती देसाई 

कोल्हापूर:  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तोकडे पडे घालून जाणार्‍या भाविकांना मंदिरात प्रवेश न देणाऱ्या निर्णयाच्या  विरोधात भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतलेला हा निर्णय नवरात्रोत्सवापूर्वी मागे न घेतल्यास देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना चोपणार असल्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला.आहे त्या कोल्हापुरात बोलत होत्या.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई ची ख्याती जगभर आहे अंबाबाई देवीच्या दर्शनाला नुसतं महाराष्ट्रातून नाही तर विविध देशातून लोक दर्शनाला येतात नवरात्र उत्सव काळात तर भाविकांची दर्शन घेण्याची संख्या ही 25 लाखांच्या वर जाते.
अंबाबाईचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घातल्यास त्यांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी नुकताच जाहीर केला आहे. या निर्णयाला भुमाता ब्रिगेड च्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी थेट आव्हान दिल आहे. हा निर्णय नवरात्र उत्सवाच्या पूर्वी मागे न घेतल्यास समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना चोपणार असल्याचं देसाई यांनी म्हटले आहे तसेच एकीकडे न्यायव्यवस्था आहे महिलांच्या बाजू नसताना देवस्थान समितीचे अध्यक्ष हे प्रसिद्धीसाठी महिलांवरती जाचक नियम घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोप देखील देसाई यांनी केलाय जाधव यांना जर देवस्थान समिती मध्ये चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी देवस्थान समितीतील भ्रष्टाचार जमीन घोटाळा मंदिर व्यवस्थापन याकडे लक्ष द्यावे असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
150 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)