महिलांची कारखान्यात वर्दळ वाढली 

वाहन उद्योगांकडून महिला कर्मचारी वाढविण्यासाठी पुढाकार 
मुंबई: भारतीय उद्योग जगताने कामाच्या ठिकाणावरील महिलांचा सहभाग वाढविण्याचे चांगलेच मनावर घेतले असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातल्या त्यात वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पात महिलांची संख्या आता वेगाने वाढत आहे. काही कंपन्यांतील बड्या अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. महिंद्रा समूहाने तर तब्बल 33 टक्‍के महिला अभियंत्याची नियुक्तीकरण्याचा विडा उचलला आहे. महिलांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आपल्या सर्वसाधारण सभेत अभिमानाने सांगत आहेत.
आतापर्यंत कार आणि मोटार सायकल उद्योगातील शॉप फ्लोअरवर महिलांचा सहभाग दिसत होता. आता ट्रॅक्‍टर आणि ट्रक तयार करणाऱ्या कारखान्यातही महिलांची संख्या वेगाने वाढत असतांना दिसत आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा ईशर मोटार्स, हिरो मोटो कॉर्प आणि बजाज ऑटो सारख्या नामांकित कंपन्या शॉप फ्लोअरवरील महिलांचे प्रमाण जास्त वेगाने वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
चार वर्षापूर्वी टाटा मोटर्सने गरीब घरातील फक्‍त पाच मुलींना शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य देऊन शॉप फ्लोअरवर सामील करून घेतले होते. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी होत असल्याचे त्यांना आढळून आल्यानंतर आता चार वर्षात टाटा मोटर्स मधील महिला कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 1812 इतकी झाली असून एकूण कर्मचाऱ्यात हे प्रमाण चार टक्‍के इतके भरते. आता आगामी काळात हे प्रमाण वेगाने वाढण्याची शक्‍यता असल्याचे या कंपनीला वाटत आहे.
महिंद्रा कंपनीने हा प्रयोग 2016 मध्ये सुरू करून 23 कर्मचाऱ्यांना शॉप फ्लोअरवर घेतले. तेथे दोनच वर्षात महिलांची संख्या 380 वर गेली आहे. कंपनीच्या स्वराज या ट्रॅक्‍टर कारखान्यात आता 250 महिला कामगार शॉप फ्लोअरवर काम करीत आहेत.
हे तर सोडाच ईशर मोटार्सच्या रॉयल इनफिल्ड इंजिन तयार करणाऱ्या करणाऱ्या कारखान्यात सर्वच्या सर्व म्हणजे 140 कर्मचारी महिला आहेत. हिरो मोटो कॉर्प या दुचाकी क्षेत्रातील कंपनीने यासाठी तेजस्वीनी प्रकल्प राबविला आहे. या कंपनीच्या कारखान्यात 160 महिला काम करीत आहेत.
बजाज ऑटोने चाकण आणि पंतनगर येथील प्रकल्पात फक्‍त महिलांचा समावेश असलेल्या असेंम्ली लाईन सुरू केल्या आहेत. 2013-14 मध्ये या कंपनीच्या विविध कारखान्यांना केवळ 148 महिला काम करीत होत्या. आता या कंपनीच्या कारखान्यात तब्बल 355 महिला कर्मचारी काम करीत असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत बोलतांना टाटा मोटर्सचे मुख्य मनुष्य बळ विकास अधिकारी रवींद्र चंदेल यांनी सांगितले की, आमचा ठाम विश्‍वास आहे की, महिलासाठी जे चांगले आहे ते समाजासाठीही चांगले असते. आणि जे समाजासाठी चांगले असते ते उद्योगांसाठीही चांगलेच असते. त्यामुळे या उद्योग समूहाने ठरवून महिलांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महिंद्र कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी राजेश्‍वर त्रिपाठी यांनी याबाबत सांगितले की, आता आमच्या सर्व कारखान्यांतील महिला कामगारांची संख्या वाढून ती तब्बल 7.5 टक्‍क्‍यावर गेली आहे. पुरुष जे काम करतात तेच काम महिला करतात. कंपनीच्या कांदिवली कारखान्यातील महिला कामगार आरती पाटोळे यांना बेजिंग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेल्डींग स्पर्धेत उत्कृष्ट वेल्डर म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)