महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर निर्बंध घाला 

भारताची संयुक्तराष्ट्रांकडे मागणी 

संयुक्तराष्ट्रे: महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या दहशतवादी संघटना तसेच त्यांचा युद्ध हत्यारासारखा वापर करणाऱ्या गैरसरकारी संघटनांवर संयुक्तराष्ट्रांनी निर्बंध लागू करावेत, अशी मागणी भारताने संयुक्तराष्ट्रांकडे केली आहे. व्यक्तीगत पातळीवरही असे प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात निर्बंध लागू करावेत अशी भारताची मागणी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगात असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निरीक्षण थेट संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनीच नोंदवले आहे त्या पार्श्‍वभूमीवर भारताताच्या संयुक्तराष्ट्रांतील पर्मनंट मिशन मधील सेक्रेटरी पौलोमी त्रिपाठी यांनी हे प्रतिपादन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की संयुक्तराष्ट्रांच्या शांतता प्रस्थापनेच्या कार्यातही महिलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याची गरज आहे. संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने आयोजित केलेल्या या विषयीच्या एका खुल्या चर्चेत बोलताना त्या म्हणाल्या की संयुक्तराष्ट्रांच्या शांतता प्रस्थापनेच्या कार्यात आत्ता पर्यंत महिलांना केवळ मर्यादित प्रतिनिधीत्वच दिले गेले आहे.

आज जगभरातील दहशतवादी संघटना किंवा ज्यांना नॉन स्टेट ऍक्‍टर म्हणतात असे घटक आपल्या कारवाया अधिक व्यापक करीत आहेत. त्यांच्या विध्वंसक कारवायांमध्ये आता महिलांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात असून त्यांच्यावर अत्याचार तर होतातच पण अलिकडच्या काळात त्यांना विध्वंसक कारवायांसाठी वापरूनही घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागात ज्या गनिमी कारवाया सुरू आहेत किंवा यादव माजली आहे त्या भागातील महिलांच्या जीवनावर अत्यंत विपरीत परिणाम होताना दिसत असून निर्वासितांच्या संख्येत महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या साऱ्या स्थितीचा साकल्याने विचार करून उपाययोजना करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)