महिलांकडून घरखरेदीत वाढ

रिअल इस्टेट खरेदी करण्यासंदर्भात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये महिलांची सक्रियता वाढली आहे. भाड्याने घर घेण्यासंदर्भात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणात ऑनलाइन सर्च करतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, मालमत्तेच्या खरेदीसंदर्भातील निर्णय घेण्याच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत पुरुष काही प्रमाणात आघाडीवर आहेत. परंतु मालमत्ता खरेदी करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात 18 ते 34 वर्षे वयोगटातील महिलांची भूमिका वेगाने वाढत आहे.

मालमत्तांच्या संदर्भात ऑनलाइन सर्च करण्यात महिलांचा सहभाग वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य. प्रॉपर्टीचा ऑनलाइन शोध घेणाऱ्या महिलांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. 2016 मध्ये एका प्रॉपर्टीविषयक वेबसाइटवर भेट देणाऱ्या महिलांची संख्या 51 टक्के तर पुरुषांची संख्या 49 टक्के होती. 2018 मध्ये आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार, ही टक्केवारी अनुक्रमे 54 आणि 46 टक्के इतकी आहे. अर्थातच, घरांचा ऑनलाइन शोध घेणाऱ्यांमधील पुरुषांचे प्रमाण कमी झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– अंजली महाजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)