महिना उलटला, तरी गुणपत्रिका बोर्डातच

दहावी फेरपरीक्षा निकालाची पाकिटे शाळांनी नेलीच नाहीत

– श्रध्दा कोळेकर

पुणे – फेरपरीक्षेचे अर्ज भरणे असो किंवा त्यांचे निकाल वाटणे शाळांचा हलगर्जीपणा या फेरपरीक्षांच्या वेळी कायमच दिसून आला आहे. पुणे विभागीय मंडळांतर्गत वाटप करण्यात आलेल्या निकालांमध्ये पुण्यातील-96 तर नगर -31 व सोलापूरमधील 33 शाळांनी अजून निकालाची पाकिटेच बोर्डाततून उचललेली नाहीत. त्यामुळेच अर्थातच याचा फटका विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होणार असल्याचे दिसत आहे.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घोषणा करत ऑक्‍टोबरदरम्यान होणारी फेरपरीक्षा ही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी जुलैमध्येच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिनाभरात यंत्रणा लावून हे पेपर तपासून घेऊन निकालही लावण्याची तरतूद केली. मात्र शाळांना याचे गांभीर्य आहे का, असा प्रश्‍न आता निर्माण होतो आहे.

यंदा दहावी फेरपरीक्षेचा निकाल 29 ऑगस्ट रोजी ऑनलाइन जाहीर झाला. तर परीक्षेच्या गुणपत्रिका देण्याचे काम 6 सप्टेंबर रोजी विभागीय मंडळाकडून करण्यात आले होते. त्यानुसार अनेक शाळांनी आपली निकालाची पाकिटे नेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटपही केले. मात्र अद्यापही 160 शाळांनी ही निकालाची पाकिटेच न नेल्याने त्या शाळांमधील फेरपरीक्षार्थीच्या गुणपत्रिकाही रखडल्या आहेत. त्यामुळेच आता या शाळांबाबत कठोर भूमिका घेत बोर्डानेही 1 ऑक्‍टोबरपर्यंत ही पाकिटे न नेल्यास प्रत्येक शाळेस 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कठोर कारवाईची गरज
जे विद्यार्थी 17 क्रमांकाचा अर्ज भरुन बाहेरुन परीक्षा देतात त्यांच्याकडून काही शाळांनी नियमापेक्षा अधिक शुल्क घेण्याचे प्रकार याआधी वारंवार समोर आले होते. तर अनेक विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा न घेताच त्यांना गुणदान करणाऱ्या देखील काही शाळा शहरात आहेत. त्यातच आता निकालपत्रे अडवून विद्यार्थ्यांचे वर्ष घालविण्याचे प्रकार शाळांकडून होत असताना एकूणच या अक्षम्य चुका करणाऱ्या शाळांकडे केवळ दंड कसा काय मागितला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष भरुन निघणार आहे का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)