महिनाभरात पोस्टाच्या 650 पेमेंट बॅंका सुरू होणार

भोपाळ – भारतीय टपाल खात्या तर्फे येत्या महिनाभरात देशभरात एकूण 650 पेमेंट बॅंका सुरू होतील अशी माहिती या खात्याचे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज येथे बोलताना दिली. ते म्हणाले की या बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेची अनुमती मिळण्याची औपचारीकता येत्या महिना भरात पुर्ण होईल. या बॅंका सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणारी अन्य तयारी आम्ही पुर्ण केली आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासूनच देशात या बॅंका सुरू होतील असे ते म्हणाले. या बॅंकांच्या आधारे देशातील सुमारे दीड लाख पोस्ट ऑफिसेसमधून लोकांन बॅंकिंग सेवा उपलब्ध होऊ शकतील.

त्या आधारे देशाच्या ग्रामीण भागात बॅंकिंग सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा उद्देश सफल होईल आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेता येणे शक्‍य होईल. पोस्ट खात्याला बॅंक सेवा सुरू करण्याची अनुमती रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यातच मिळाली होती. त्या आधारे या खात्याने रांची आणि जबलपुर येथे प्रायोगिक तत्वावर दोन बॅंका सुरू केल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता देशभरात अशा आणखी 650 बॅंका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

टपाल खाते आधुनिक करण्यासाठी पोस्टमनना स्मार्ट फोन दिले जात असून त्याद्वारे लोकांना पोस्ट सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी देशभरातील 15 हजार पोस्टमनना हे स्मार्टफोन देण्यात आले आहेत असेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)