महिनाभरात पेट्रोल 4.20 रूपयांनी तर डिझेल 4.53 रूपयांनी महाग

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू असलेले इंधन दरवाढीचे सत्र शुक्रवारीही कायम राहिले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 28 आणि 22 पैशांनी वाढ झाली. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत पेट्रोल 4 रूपये 20 पैशांनी तर डिझेल 4 रूपये 53 पैशांनी महागले.

ताज्या दरवाढीमुळे पेट्रोलचा दर दिल्लीत 81.28 रूपये तर मुंबईत 88.67 रूपये इतका झाला. डिझेल दिल्लीत 73.30 रूपयांवर तर मुंबईत 77.82 रूपयांवर पोहचले. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांचे वाढलेले दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाच्या मुल्यातील मोठी घसरण या घटकांमुळे पेट्रोल, डिझेल दर वाढत आहेत. त्या इंधनांच्या दरांचा दररोज आढावा घेऊन ते बदलण्याचे किंवा जैसे थे ठेवण्याचे धोरण मागील वर्षी जूनपासून अंमलात आले. तेव्हापासून यावेळी एकाच महिन्यात सर्वांधिक दरवाढ झाली आहे.

जनसामान्यांना होरपळून काढणाऱ्या इंधन दर भडक्‍यामुळे मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. असे असले तरी इंधनांवरील कर कमी करून ते स्वस्त करण्यासंदर्भात पाऊल उचलण्याची तूूर्त सरकारची तयारी नसल्याचेच संकेत मिळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)