महिंद्रा सिंटर कामगारांचा वेतनवाढ करार मार्गी

पिंपरी – येथील जी. के. एन सिंटर मेटल्स प्रा. लि. व महिंद्रा सिंटर कामगार संघटना यांच्यात शुक्रवारी (दि. 29) तीन वर्षाचा वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराचा कालावधी 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2020 असा असेल. या करारा अंतर्गत किमान 15 हजार 265 रुपये तर कमाल 22 हजार 80 रुपयांची वाढ झाली आहे. या शिवाय विविध भत्त्यामध्ये वाढ झाली आहे.कामगार कुटुंबियांसाठी मेडीकल पॉलिसीचाही लाभ दिला जाणार आहे. या करारामुळे कामगारांचे किमान मासिक वेतन 39 हजार 560 रुपये तर कमाल 77 हजार 500 रुपये झाले आहे. जानेवारी 2018 ते जून 2018 या पाच महिन्याच्या फरकाची रक्कम 82 हजार 800 प्रत्येक कामगारास मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या करारावर व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उज्ज्वल भट्टाचार्य, प्रकल्प संचालक संभीत प्रहराज, उत्पादन विभाग प्रमुख दीपक जाधव, तसेच मानस संसाधन व्यवस्थापक महेश वैद्य यांनी तर कामगार संघटनेतर्फे अध्यक्ष संभाजी शिंदे, सरचिटणीस शिवाजी सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद मोरे व सचिन शितोळे, संजय सुर्वे, के. के. लातूरवाला, अनिल भुजबळ, अमित कांबळे, निलेश शिलनकर, दीपक गौंड, प्रशांत चौगुले यांनी स्वाक्षऱ्या केल्या. करारानंतर कामगारांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)