महिंद्रा क्‍लबच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेला शंभर डस्टबिन भेट

लोणावळा, (वार्ताहर) – स्वच्छ भारत अभियान अंर्तगत महिंद्रा क्‍लबच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेला कचरा व्यवस्थापनासाठी 109 मोठे डस्टबिन भेट देण्यात आले. स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत महिंद्रा क्‍लबचे “सीएसआर’च्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये मुलींकरिता स्वच्छतागृह बांधणे, युवक, शेतकरी यांच्याकरिता मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. लोणावळा शहरात स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला हातभार म्हणून महिंद्रा क्‍लबच्या वतीने ही मदत करण्यात आली.

महिंद्रा क्‍लबचे सीएसआर प्रकल्पाच्या माध्यमातून व महिंद्रा क्‍लबचे प्रकल्प उपाध्यक्ष सुशील सिंग यांच्या पुढाकाराने देण्यात आलेले 100 डस्टबिन लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरोग्य विभागाच्या सभापती बिंद्रा गणात्रा, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, नगरसेवक सुनील इंगूळकर, बांधकाम समिती सभापती गौरी मावकर, महिंद्रा क्‍लबच्या प्रमिला मोहिते व अमित धालवडे, शिक्षण समिती सभापती जयश्री आहेर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले, अनिस गणात्रा उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)