पिंपरी – खराळवाडी प्रभागातील महिंद्रा कंपनीच्या सहा एकर जागेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय उभारण्यात यावे, अशी मागणी हिंद कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कारभार सुरु झाला आहे. मात्र, आयुक्तालयासाठी जागेचा अभाव आहे. महिंद्रा कंपनीची सहा एकर जागा रहिवासी झोनमध्ये करताना महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.

या जागेत प्रशस्त असे पोलीस आयुक्तालय होवू शकते. तसेच ही जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला सूचना कराव्यात. हा निर्णय शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा व सोईचा असेल, असे डॉ. कैलास कदम यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)