महिंद्राकडून एसयूव्ही मराझ्झो सादर

पुणे: महिंद्रा अँड महिंद्रा या प्रीमिअम एसयूव्ही उत्पादकांनी मराझ्झो दाखल केली. मराझ्झोमध्ये सर्वोकृष्ट अभियांत्रिकीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आरामदायी व तत्पर नियंत्रण, शांत केबिन, शीघ्र कूलिंग व आतमध्ये ऐसपैस जागा अशा वैशिष्टयांचा समावेश करण्यात आला आहे. महिंद्रा डिलरशिपमध्ये मराझ्झो एम- 2 प्रकारासाठी 9.99 लाख रुपये (एक्‍स-शोरूम) या किमतीपासून उपलब्ध होणार आहे.

या एसयूव्हीच्या सादरीकरणावेळी नाशिक येथे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले, आम्ही नव्या विश्‍वामध्ये प्रवेश करत आहोत आणि यापुढेही अशी वाहने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले की, महिंद्राच्या नव्या, जागतिक दृष्टिकोनाची झलक मराझ्झोमध्ये दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे वाहन उत्कृष्ट ठरण्यासाठी डेट्रॉइटमध्ये तयार केले आहे. त्याची आखणी इटलीतील पिनिनफरिनाच्या सहयोगाने आमच्या इन-हाउस टीमने केली आहे, तसेच हा संपूर्ण प्रकल्प चेन्नईजवळील एमआरव्ही या आमच्या अद्ययावत संशोधन व विकास प्रकल्पात साकारला आहे. कंपनीचे ऑटोमोटिव्ह सेक्‍टरचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले की, या गाडीचे उत्पादन नाशिक येथील प्रकल्पात केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)