महिंदा राजपक्षे यांनी नवीन पक्षामध्ये केला प्रवेश 

कोलोंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी वादग्रस्त पद्धतीने पंतप्रधानपदी नियुक्‍त केलेले महिंदा राजपक्षे हे “श्रीलंका फ्रीडम पार्टी’ पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यांनी आता “श्रीलंका पीपल्स पार्टी’ या नव्याने स्थापन झालेल्या पक्षात प्रवेश केला आहे. “एसएलएफपी’मध्ये सिरीसेना यांच्याबरोबरचे राजकीय सहकार्याचे संबंध राजपक्षे यांनी संपवले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांसाठी स्वतःच्या पक्षाचा झेंडा उभारण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. राजपक्षे यांच्या सहकाऱ्यांनीच “एसएलपीपी’ या पक्षाची स्थापना केली आणि आज सकाळीच राजपक्षे यांनी या पक्षाचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले आहे.

राजपक्षे यांचे वडील डॉल अल्वीन राजपक्षे हे 1951 साली स्थापन झालेल्या “श्रीलंका फ्रीडम पार्टी’चे संस्थापक सदस्य होते. राजपक्षे यांना राजकारणात नव्याने प्रवेश करता यावा म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून “श्रीलंका पीपल्स पार्टी’ गेल्याच वर्षी स्थापन करण्यात आली. या नव्या पक्षाने फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण 340 जागांपैकी दोनतृतीयांश जागा जिंकल्या आहेत.

-Ads-

राजपक्षे हे 2005 पासून श्रीलंकेच्या अध्यक्षपदी होते. मात्र 2015 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये सिरीसेना यांनी विक्रमसिंघे यांच्या “युनायटेड नॅशनल पार्टी’च्या मदतीने राजपक्षे यांचा पराभव केला होता. मात्र सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांच्यात आर्थिक आणि संरक्षण धोरण निश्‍चिती आणि सत्तावाटपाच्या मुद्दयांवरून मतभेद झाल्याने सिरीसेना यांनी काही दिवसांपूर्वी विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवून राजपक्षे यांची नियुक्‍ती केली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)