महा बॅंकेला रु.794 कोटी रुपये कार्यान्वयन नफा

सातारा – बॅंक ऑफ महाराष्ट्र आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसऱ्या तिमाहीत नफा दर्शवत आहे. आपल्या भागधारकांना चांगला परतावा मिळण्यासाठी आणि सातत्यपूर्ण वृद्धीसाठी बॅंक निरंतर प्रयत्न करत आहे. कार्यक्षमतेमध्ये सुधार, किरकोळ कर्जामध्ये वृद्धी तसेच ग्राहक आणि भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर बॅंकेने आपले लक्ष केन्द्रित केले आहे, अशी माहिती बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि सरव्यवस्थापक आणि मुख्य वित्त अधिकारी व्ही. पी. श्रीवास्तव यांनी दिली.
बॅंकेने या आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रुपये 27.00 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे.कार्यान्वयन नफ्यामधील वाढ 15% आहे. आर्थिक वर्ष 2018 मधील दुसऱ्या तिमाहीमध्ये हा नफा रु. 692 होता आणि आता या तिमाहीमध्ये तो रुपये 794 कोटी झालेला आहे. व्याजेतर उत्पन्नामध्ये 10% वाढ झालेली आहे. निव्वळ व्याज उत्पन्न या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रु 1003 कोटी झाले. या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीस जुन्या बुडीत कर्ज खात्यामधील वसूली जोमदार होवून तिची वाढ 882% झाली.या वर्षीच्या तिमाहीत वसुली 132.33 कोटी झालेली आहे.
बॅंकेचा एकूण व्यवसाय 30 सप्टेंबर 2017 मधील रुपये .2,28,062 कोटी वरून या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु. 2,26,069 कोटी इतका झाला आहे. एकूण गुंतवणुकीमध्ये 38% ने वाढ झाली आहे.30.09.2017 रोजी एकूण गुंतवणूक रुपये 37466 कोटी होती ,ती आता 30.09.2018 रोजी रु. 51662 कोटी इतकी झाली आहे. अनर्जक गुंतवणुकीमध्ये घट झाली असून गेल्या वर्षि त्या रु. 687 कोटी रुपये होत्या. आज त्या त्या रु. 290 कोटी इतक्‍या राहिल्या आहेत.
ए. सी. राऊत यांनी भविष्याकालीन योजनांची माहिती देताना ते म्हणाले, कृषी कर्जे, किरकोळ कर्जे आणि लघु तसेच माध्यम उद्योगांच्या कर्जांवर अधिक लक्ष केंद्रीत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वसुलीसाठी अथक प्रयत्न करणे आणि खासकरून बुडीत कर्जांच्या वसुलीवर लक्ष देणे आणि नवीन कर्जांच्या थकीत होण्यापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणे.गैर व्याजेतर उत्पन्नाच्या वृद्धीवर लक्ष केंद्रीत करणे आणि कार्यान्वयीन खर्चावर अंकुश ठेवणे हे आमचे ध्येय आहे असे राऊत म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)