महासभेवर तहकुबीची टांगती तलवार?

पिंपरी- महापौर राहुल जाधव व महत्त्वाचे पदाधिकारी अद्यापही बार्सिलोना दौऱ्यावरून परतले नाहीत. तसेच लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे उद्याची (दि.20) नियोजित मासिक महासभा होणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा दिवाळीच्या सुट्टीत गेला. महापालिकेला सलग 6, 7, 8, 9, 10 आणि 11 नोव्हेंबर अशी सहा दिवस सुट्टी होती. त्यानंतर सोमवारी (दि.12) स्मार्ट सिटीचे संचालक असलेले पदाधिकारी आणि अधिकारी स्पेन देशातील बार्सिलोना शहराच्या दौऱ्यावर गेले होते. स्मार्ट सिटीचे संचालक असलेले महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांचा दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यामुळे मागील आठवड्यात देखील प्रशासन सुस्तावले होते.

स्पेन दौऱ्यावरुन आयुक्त श्रावण हर्डीकर दोन दिवसांपूर्वीच शहरात परतले असून, त्यांना कार्यालयीन कामकाजात सहभाग घेतला आहे. तर, काही पदाधिकारी शहरात आले असून विरोधी पक्षातील नेता अद्यापही परदेशातच आहे. नोव्हेंबर महिन्याची महासभा उद्या असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक आज पार्टी मिटिंगसाठी पालिका वर्तुळात फिरत होते; मात्र पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडून कोणताही निरोप आला नाही. त्यामुळे ते मिटिंगविना परत गेले. नगरसवेकांची पार्टी मिटींग न घेतल्याने उद्या होणारी सभा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

महासभेपुढे पिंपरी-चिंचवड शहरात एलईडी पथदिवे बसविणे, सह शहर अभियंतापदी मकरंद निकम यांना बढती देणे, आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेला मंजुरी देणे, पीएमपीएलच्या बस पार्किंगसाठी महापालिका मुख्यालयासमोरील जागा देणे, महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) मधील मल्टिप्लेस हायड्रोलिंक ऑक्‍सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टिमसाठी (एचबीओटी) केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. यासारखे महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी विषय पत्रिकेवर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)