महावीर जयंतीनिमित्त वाघोलीत अहिंसा रॅली

वाघोली – महावीर जयंतीनिमित्त श्री जैन श्रावक संघाच्या वतीने अहिंसा आणि शाकाहाराचा संदेश देत वाघोली येथे अहिंसा रॅली काढण्यात आली. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. माजी उपसरपंच मंदा जाधवराव, बीजेएसचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, राजेंद्र भाडळे यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. शिवाजी पुतळा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. भगवान महावीरांच्या विविध संदेशाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, सरपंच वसुंधरा उबाळे यांनी अहिंसा रॅली दरम्यान भेट देऊन शुभेच्छा दिल्या. वाघेश्वर मंदिराजवळील अभिषेक लॉन्स येथे सांगता झाली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, माजी उपसरपंच समीर भाडळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी “पचीस बोल’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. भगवान महावीर स्वामींचे आचार, विचार आत्मसात करा. त्यांचा संदेश समाजात रुजवा, असे मत प. पु. राजाराम मुनी महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. रक्तदान शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले. सायंकाळी भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात संगीतकार तरुण मोदी यांनी गीते सादर केली. संघाचे अध्यक्ष शेखर लुंकड यांनी प्रास्ताविक केले, तर मनोज कांकरिया यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)