महावीर जयंतीनिमित्त रक्‍तदान शिबीर

तळेगाव-दाभाडे – जैन सोशल ग्रुप व गरवारे ब्लड बॅंकेच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त रक्‍तदान व आरोग्य शिबीर घेण्यात आले.

आरोग्य शिबिरात रक्‍त शर्करा, कोलेस्ट्रॉल, एच बी व थॉयराईड तपासण्यात आले. जीरावला पार्श्वनाथ मंदिराचे मुख्य विश्वस्त अशोक ओसवाल यांनी आरोग्य शिबिराचे उद्‌घाटन केले. नगरसेवक इंद्रकुमार ओसवाल, सह विश्वस्त दिलीप दोशी, नितीन शाह व विनोद राठोड,डॉ. दिलीप भोगे, डॉ. विनायक मोरे, योगेश सपकाळे यांनी शिबिरास भेट दिली.

डॉ. भोगे मनोगतात म्हणाले, सलग 21 वर्ष हा उपक्रम महावीर जयंतीच्या दिवशी राबवून जैन सोशल ग्रुपने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. 42 दात्यांनी यावर्षी रक्‍तदान केले व 76 रुग्णांची गोळविलकर लॅबोरेटरीने मोफत तपासणी केली. प्रकल्प प्रमुख़ किरण ओसवाल यांनी सूत्रसंचालन, अध्यक्ष राकेश ओसवाल यांनी आभार मानले. दिनेश शाह, हितेश राठोड, संजय अमृतलाल, समीर ओसवाल, घन:श्‍याम राठोड, भारत राठोड, राजू शाह, इंदर ओसवाल यांनी शिबीर आयोजनात विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)