महावीर जयंतीनिमित्त पारगावात शोभा यात्रा

पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे भगवान महावीर जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून शोभा यात्रा काढण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तीन तालुक्‍यातील जैन बांधव उपस्थित होते, तसेच पारगाव शिंगवे काठापूर, लाखणगाव जांबुत, पिंपरखेड, अवसरी, मंचर, नारायणगाव, खोडद, रांजणी, वळती, मांजरवाडी, घोडेगाव या गावातील जैन बांधवांनी एकत्र येऊन महावीर जयंती साजरी केली. या वेळेस पारगावातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. पं. पू. सुप्रियाजी महाराज, पं. पू. सुप्रभाजी महाराज, पं. पू. सुभोधीजी महाराज आदी गुरूंचे या वेळेस प्रवचन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन संतोष गांधी, नवीन गुगळे, उदय शेठिया, निशांत शहा, रसिक गुगळे, बाळू बोरणा, गिरीश राठोड आदींनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)