महाविद्यालय, कार्यालयांत होणार “हेल्मेटसक्‍ती’चा तास

जनजागृतीचे प्रयत्न : पोलीस मुख्यालयातही होणार मार्गदर्शन

पुणे – हेल्मेटसक्तीपूर्वी जनजागृतीसाठी वाहतूक पोलीस सरसावले आहेत. कमी वेळात जास्त लोकांपर्यत पोहचण्यासाठी प्रमुख महाविद्यालये, सरकारी कार्यालयांनाबाहेर मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी हेल्मेट नसलेल्यांना समुपदेशनाला उपस्थित राहण्याविषयीची नोटीस देण्यात येत असून लायसन्स ठेऊन घेण्यात येत आहे. समुपदेशनानंतरच संबंधितांचे लायसन्स परत केले जाणार आहे.

शहरात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे असून याविषयी जनजागृती केली जात आहे. यापूर्वी हेल्मेटसक्तीचे निर्णय मागे घेतल्याने यावेळी पोलिसांनी मनावर घेतले आहे. यासाठी कारवाईपेक्षा पहिल्या टप्प्यात समुपदेशनाला प्राधान्य देण्यात आले आहे. या माध्यमातून हेल्मेटचे महत्त्व सांगून त्यांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. यासाठी वाहतूक पोलीस विभागाला सूचना देण्यात आला आहेत. शहारातील प्रमुख महाविद्यालये, सरकारी कार्यालयांच्या ठिकाणी ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामध्ये हेल्मेटसक्तीचे महत्त्व सांगण्यात येत आहे.

हेल्मेटसक्ती अंमलबजावणीपूर्वी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न आहे. हेल्मेट कसे महत्त्वाचे आहे?, त्याबाबत गैरसमज दूर करण्यासाठी समुपदेशनाचा तास घेण्यात येणार आहे. यासाठी हेल्मेट न वापरणाऱ्यांना नोटीस देण्यात येत असून समुपदेशनाला उपस्थित राहण्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.7) पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे समुपदेशनाचा तास घेण्यात येईल.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक

रोज 200 जणांना नोटीस
हेल्मेट न वापरणाऱ्यांना जनजागृतीसाठी सर्व वाहतूक विभागांना मोहीम राबवण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारे दररोज सुमारे 200 जणांना समुपदेशनाची नोटीस देण्यात येत आहे. या सर्वांना समुपदेशनाला उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले असून यानंतर लायसन्स परत केले जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)