महाविद्यालये, विद्यापीठांच्या आवारात जंक फुड विक्रीवर बंदी घालावी

युजीसीचा आदेश : आजारांना आळा घालण्यासाठी पाऊल
नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांच्या आवारात जंक फुडच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनेनंतर युजीसीने संबंधित आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे.

संबंधित परिपत्रकाचे कठोरपणे पालन केले जावे. नव्या पिढीत जागृती केली जावी. जंक फुडवरील बंदीमुळे आरोग्यदायी अन्नाबाबत सजगता निर्माण होईल. चांगले जगण्यासाठी, योग्यप्रकारे शिक्षण घेण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी ते पाऊल प्रभावी ठरेल. शरीराच्या अतिरिक्त वजनाशी थेट संबंध असणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी जंक फुडवरील बंदी उपयोगी ठरेल, असे युजीसीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

-Ads-

अशाच प्रकारचा आदेश याआधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्याशी संलग्न असणाऱ्या शाळांना दिला होता. विद्यार्थ्यांच्या डब्यांमधील खाद्यपदार्थांची तपासणी करावी, नियमितपणे त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवावी आणि पोषक आहाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)