महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती

पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांचे मार्गदर्शन

दौंड- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस ठाण्याची दैनंदिन कारभाराची माहिती व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबरच पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी पोलीस दलाच्या शस्त्रांची महत्त्वपूर्ण माहिती देत बहुमोल मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात दि. 2 ते 8 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात पोलीस रेझींग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सर्व सामान्य नागरिकांना पोलीस दलाची ओळख व्हावी, यासाठी पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबववण्यात आले.या पार्श्‍वभुमीवर दौंड पोलीसांच्यावतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरेवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली. तसेच सोशल मिडीयाचे दुष्परिणाम व सुरक्षित नेट बॅंकिंगबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
यावेळी दौंड रोटरी क्‍लबच्या सदस्यांशी संवाद साधताना आधुनिक पोलिसींग बाबत भूमिका समजावून सांगून सोशल मिडियावर महिलांचे फोटो प्रसारीत केल्यास होणाऱ्या शिक्षा तरतुदींबाबत व माहिलांनी सोशल मिडियावर वैयक्तिक माहिती प्रसारीत न करण्याबाबत सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)