महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

पिंपरी – कॉलेजच्या परिसरात उभ्या असलेल्या तरुणीचा दोन जणांनी विनयभंग केला. ही घटना नुकतीच पिंपरी येथे घडली.

मुवाज आणि आयान (पूर्ण नाव माहिती नाही. दोघेही रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 20 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या पार्किंगमध्ये उभी होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी मुवाज याने त्या तरुणीचा हात पकडून तिला बाजूला नेले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगितले. मात्र त्या तरुणीने प्रतिकार केला असता आरोपी आयान यानेही तरुणीचा हात पकडून मुवाजचे तुझ्यावर खरच प्रेम असल्याचे सांगत त्या दोघांनीही विनयभंग केला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)