महाविद्यालयीन अर्थशास्त्र परिषदेला शनिवारी कोल्हापूरात प्रारंभ

फलटण – कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच कोल्हापूर व कोकण विभाग यांची 19 वी अर्थशास्त्र परिषद शनिवार व रविवार दि. 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथे आयोजित केली असल्याची माहिती विचार मंचचे अध्यक्ष प्रा. शरद शेटे यांनी दिली.

दोन दिवसीय अर्थशास्त्र परिषदेचा शुभारंभ शनिवार दि. 1 डिसेंबर रोजी नाव नोंदणीनंतर दुपारी 1 वाजता कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदुम यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अमोल कोरेगावकर आहेत. तर बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सिनियर मॅंनेजर डॉ. प्रकाश मिसाळ प्रमुख वक्ते आहेत. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष प्रसादजी कामत व्यवस्थापन समिती सदस्य अड. व्ही. एन. पाटील, विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एन के पाटील कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही ए. पाटील. नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यानंतरच्या सत्रात बॅंकींग क्षेत्रातील बदलते प्रवाह व कार्ल मार्क्‍सचे आर्थिक विचार याविषयावरील शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी अर्थशास्त्र विचार मंचची वार्षिक सभा होणार आहे.

-Ads-

रविवार दि. 2 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात कर्जमाफिचा सहकारी संस्थावरील परिणाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन या विषयावरील शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर आदित्य बिर्ला कंपनीचे अधिकारी शेअर बाजाराची व शेअर्स खरेदी विक्रीची माहिती देणार आहेत. सांगता समारंभप्रसंगी व्यवसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे अँकेडमिक कौन्सिल सदस्य डॉ. डी. के. मोरे हे प्रमुख अतिथी असून प्राचार्य डॉ. व्ही ए. पाटील. अध्यक्षस्थानी आहेत. तरी या अर्थशास्त्र परिषदेस सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र, सहकार शिक्षकांनी उपस्थित रहावे असे अवाहन अर्थशास्त्र परिषदेच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा काळे व सचिव प्रा. अनिल निर्मले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)