महावितरण थकबाकीदारांची नावे करणार जाहीर

पिंपरी – महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांना वारंवार वीजबील भरण्याच्या सूचना करुनदेखील काही ग्राहक याकडे लक्ष देत नाहीत. सातत्याने होणाऱ्या थकबाकीमुळे महावितरण दिवसेंदिवस तोट्यात चालले आहे. त्यामुळे अशा ग्राहकांकडून पैसे वसुल करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर महावितरण आता अशा ग्राहकांना चांगलाच दणका देणार आहे. ज्यांना वारंवार सांगुनदेखील थकबाकी दिलेली नाही अशा ग्राहकांची नावे आता स्थानिक वृत्तपत्रातुन प्रसिध्द करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

यामध्ये सुरवातीला दर महीन्याला 10 मोठ्या थकबाकीदारांची नावे स्थानिक वृत्तपत्रातुन जाहीर करण्यात येणार आहेत. महावितरणच्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवरील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. विजेचा वापर करुनही त्यापोटी येणारे बिल न भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यामुळे महावितरण विभागाने नाईलाजास्तव हे पाऊल उचलले असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी सांगितले.

यामध्ये घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक अशा सर्वच प्रकारच्या ग्राहकांचा समावेश असणार आहे. या निर्णयानुसार आता दर महिन्याच्या 25 तारखेपर्यंत 10 मोठ्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रांतुन छापण्यात येणार आहे. या यादीत एकदा प्रसिध्द झालेले नाव हे पुन्हा प्रकाशीत होणार ऩाही. तसेच ज्या ग्राहकांनी चुकीच्या आलेल्या वीजबीलामुळे आपले वीजबील भरले नाही अशांनी महावितरण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)