महावितरण खर्चाच्या नोंदीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये धुमश्‍चक्री

“सूत्रधारी’चे संचालक विश्‍वास पाठक यांनी राजीनामा देण्याची दिली पुष्टी


महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी खर्च मिळणार नसल्याचे सांगितले

पुणे – महावितरणच्या 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षातील खर्चाच्या नोंदीवरून सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी भर पत्रकार परिषदेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना खोटे ठरविले. महावितरणने या दोन वर्षांतील खर्च लेखा पुस्तकात घेतला नसल्याने महावितरणला हा खर्च मिळणार नाही, असे संजीव कुमार यांनी स्पष्ट केले होते. मात्र, याबाबत पाठक यांनी आक्रमक भुमिका घेत असे काही घडलेलेच नाही. खर्चाच्या नोंदी ठेवल्या नाही, ही माहिती खोटी आहे, असे स्पष्ट केले. तसेच जर महावितरणने खर्चाच्या नोंदी ठवल्या नसतील तर, मी संचालक पदाचा राजीनामा देईल, अशी पुष्टीही जोडली.

महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपन्यांच्या सूत्रधारी कंपनीचे (एम. एस. ई. बी. होल्डिंग कंपनी) संचालक विश्वास पाठक यांनी ऊर्जा विभागाच्या चार वर्षांतील कामकाजाची माहिती आज पत्रकारांना दिली. महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सचिन तारेमाल, बारामती विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे या वेळी उपस्थित होते.

महावितरण त्या वीज दर प्रस्तावास आयोगाने सप्टेंबर महिन्यात मंजूरी दिली. या प्रस्तावात 30 हजार 646 कोटी रुपयांच्या दरवाढीची मागणी करण्यात आली होती. मात्र, आयोगाने एकूण मागणीच्या 20 हजार 651 कोटींच्या मागणीस मान्यता दिली. तसेच 2018-19 व 2019-20 या दोन आर्थिक वर्षांसाठी केवळ 8 हजार 268 कोटी रुपये वीज दराच्या माध्यमातून आणि 12 हजार 382 कोटी रुपये नियामक भत्ता पुढील कालावधीमध्ये वसूल करण्यास मान्यता दिली आहे.

त्यामुळे महावितरणचा खर्च आणि वसुलीचा ताळमेळ साधणे मोठे आव्हान ठरणार आहे. या परिस्थितीतच महावितरणने2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षातील संचलन आणि सुव्यवस्थेवरील खर्चाच्या नोंदी लेखा पुस्तकात घेतल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने या हक्काच्या खर्चासही मान्यता दिली नाही, असे संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या पुढे महावितरणला खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी लेखी स्पष्ट केले.

याबाबत पाठक यांना विचारले असता, महावितरणच्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवली जाते. कदाचित नोंद वेगळ्या पद्धतीने ठेवली असेल. मात्र, खर्चाच्या नोंदी ठेवल्याच नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. जर, महावितरणने खर्चाच्या नोंदी ठेवल्या नसतील मी संचालक पदाची राजीनामा देईल.

नक्‍की खोटे कोण?
महावितरणने 2015-16 व 2016-17 या दोन वर्षांतील खर्चाच्या नोंदी लेखा पुस्तकात नोंदविल्या नसल्याने वीज नियामक आयोगाने या दोन वर्षांतील खर्चाला मान्यता दिली नाही, असे महाविरतणचे अध्यक्ष व व्यव्यापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या विद्युत वार्तामध्ये स्पष्ट केले आहे. एकीकडे वीज नियामक आयोग खर्चाला मान्यता देत नाही. ही बाब कंपनीचे अध्यक्ष सार्वजनिकरित्या उघड करतात. तर, दुसरीकडे सूत्रधारी कंपनीचे संचालक ही बाब खोटी असल्याचे सांगत थेट या सर्वांनाच खोटे पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नक्की खोटे कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)