महावितरण खरेदी करणार 30 लाख वीज मीटर

पिंपरी – राज्यभरातील वीज ग्राहकांना वीज मीटर मिळत नसल्याची ओरड होत आहे. ही तक्रार दूर करण्यासाठी लवकरच महावितरण लाखो वीज मीटर खरेदी करणार आहे. मे 2019 अखेर एकूण 30 लाख वीज मीटर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे.

वीज मीटरचा तुटवडा जाणवू नये म्हणून महावितरणने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. भविष्यात महावितरणच्या वीज ग्राहकांना नवीन मीटरची टंचाई जाणवू नये म्हणून आणखी 20 लाख मीटर नव्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. महावितरणच्या विविध कार्यालयांत “सिंगल फेज’चे सध्या सुमारे 2 लाख 31 हजार तर “थ्री फेज’ सुमारे 1 लाख 63 हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत.

याशिवाय महावितरणने 30 लाख नवीन “सिंगल फेज’ वीज मीटरची खरेदी केली असून पहिल्या टप्प्यात त्यातील 89 हजार नवीन मीटर ऑगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे 2 लाख 60 हजार मीटर्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे 3 लाख 80 हजार नवीन वीज मीटर ग्राहकांना दिले जाणार आहेत. 2019 च्या मे महिन्यापर्यंत हे 30 लाख मीटर महावितरणला मिळणार आहेत.

मागील काही महिन्यांत केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तसेच संपूर्ण राज्यात जुनी इलेक्‍ट्रो-मेकॅनिकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवला होता. परंतु, आता राज्यात कुठेही मीटरचा तुटवडा नाही, अशी माहिती या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

व्याजापोटी 46 कोटींचा परतावा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार बॅंकेच्या “बेस रेट’नुसार व्याज देण्यात येते. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 20 लाख 98 हजार वीज ग्राहकांना 46 कोटी 82 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)