महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक त्रस्त

वीज महावितरण कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणीक संप

नगर: महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रविवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या एकदिवसीय संपाने शहरातील अर्ध्या अधिक भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला . तांबटकर गल्ली, नवीपेठ, चितळे रोड, महाजन गल्ली, रंगारगल्ली यांसह विविध भागात वीजपुरवठा खंडीत झाल्याने मध्यरात्रीपासून नागरिकांची तारांबळ उडाली. वीज नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले असून वीजेच्या खेळखंडोबाने चांगलाच झटका दिला आहे.
महापारेषण कंपनीतील स्टॉप सेटअप लागू करीत असताना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता अमलात आणावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करूनच अंमलबजावणी व्हावी, खासगीकरण फ्रॅंचायसी करण्याचे धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार शेत्रात कार्यरत असलेल्या लघू जलविद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे, महानिर्मिती कंपनीच्या 210 मे.बॅ. चे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, तीन ही कंपनी यातील सर्व कर्मचाऱ्यांकरिता मान्य केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धरतीवरील पेन्शन योजना लागू करा, तिन्ही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे, तीनही कंपनीतील बदली धोरणाच्या पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबविण्यात यावे, तिन्ही कंपन्यातील कंत्राटी वआऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कायम कामगारम्हणून सामावून घ्यावे व समान काम समान वेतन बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा, आदी मागण्यांसाठी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला.

वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने विद्युत महावितरण कार्यालयासमोर वरील मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या संपात कृष्णा भोयर, शंकर पहाडे, आर. टी. देवकांत, सुनील जगताप, सय्यद जहिरोद्दीन, हिंदुराव पाटील, प्रकाश शेळके, धीरज गायकवाड, भाऊसाहेब भाकरे, प्रवीण जबर, संजय दुधाणे, गणेश कुंभारे,नितीन पवार, सदाशिव भागवत, बी.के कचरे, सोपान लोणारे, सतीश भुजबळ आदीसह जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यातील कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासन पातळीवर वेळोवेळी सादर केल्या.मंत्रीमहोदयांनी आश्‍वासने देवूनही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)