महावितरण कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप

कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा

मंचर- महावितरणच्या मंचर विभाग कार्यालयासमोर वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. 7) रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत आपला राग व्यक्त केला.
सरकारकडे वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार मागणी केली; परंतु मागण्यांबाबत पूर्तता झाली नसल्यामुळे संप करण्यात आला. संघटनेने महापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करीत असताना आधीचे एकुण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावे, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचवलेल्या सुचनांचा अंतर्भाव करुनच अंमलात आणावे, खाजगीकरणाचे धोरण थांबबावे, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फ्रॅन्चाईसीवर खासगी भांडवलदार कंपनीने देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी, महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाऱ्याकरीता मान्य केलेली जुन्या पेन्शन योजनेच्या धरतीवर पेन्शन योजना लागू करावी, तिन्ही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावेत, बदली धोरणाचा पुर्नविचार संघटनेसोबत चर्चा करुन राबविण्यात यावा, तिन्ही कंपन्यातील कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्यने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे व समान काम समान वेतन बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.
संपामध्ये सबॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महावितरण वीज कामगार महासंघ (बी.एम.एस), महावितरण स्टेट इलेक्‍ट्रिक वर्कस फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (1029) इत्यादी संघटना सहभागी झाल्या आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)