महावितरण कर्मचारी निवासस्थानाची दुरावस्था

– विद्युत सनियंत्रण समितीचे प्रशासनाला निवेदन

पिंपरी – महावितरण कर्मचारी वसाहती मधील निवासस्थानांची दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्युत सनियंत्रण समितीने केली आहे.

यासंदर्भात जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर, महेंद्र कांबळे, सदस्य भरत कुंभारकर, विश्‍वास ननावरे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, ग्रामीण अधीक्षक राजेंद्र पवार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील औंध, अशोकनगर, चतु:श्रुंगी याठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, या वसाहतीमधील 350 घरांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी वारंवार तक्रार करून महावितरण प्रशासनाने लक्ष दिले नाही. शेवटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा सनियंत्रण सदस्यांकडे धाव घेतली.

शौचालय, बेसीन, नळ, फरशा, फुटक्‍या काचा, भिंतीला गेलेले तडे, अस्वच्छता, तुंबलेले सांडपाणी, वरच्या घरातील बाथरुमचे पाणी झिरपणे आदी समस्यांचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. याबाबत तक्रार निवारण बैठकीत लक्ष वेधण्यात आले होते. कॅन्टीनच्या दुरूस्तीला तातडीने मंजुरी दिली जाते. मात्र कर्मचारी निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)