महावितरण अभियंत्याकडून जीवाला धोका

पिंपरी – महावितरण मधील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. तसेच याप्रकरणी न्यायालायता धाव घेतल्याने चिडलेल्या ताकसांडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार विद्युत सनियंत्रण समिती पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे केली आहे.

तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची बाब सौंदणकर यांनी दीड ते दोन वर्षांपुर्वी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुण्यातील जनता दरबारादरम्यान निदर्शनास आणुन दिली. त्यामुळे या स्विचिंग स्टेशनचे नियोजित उद्‌घाटन न करत उर्जामंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सिंगल फेज, थ्री फेज व अन्य प्रकारचे वीज मीटर उपलब्ध करुन दिले जात नसल्याची तक्रार सौंदणकर यांनी केली होती.

याची दखल घेत, महावितरण प्रशासनाने वीज मीटरचा तुटवडा नसल्याचे सांगत, पुणे जिल्ह्याकरिता वीज मीटर उपलब्ध करुन दिल्याची माहिती दिली होती. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील महावितरणमधील भ्रष्टाचाराविषयी तक्रार केली. तसेच लोकायुक्तांकडे देखील दाद मागितली होती. त्यामुळे चिडलेल्या ताकसांडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे. आपले काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी ताकसांडे यांच्यावर असल्याचे या तक्रारीत नमूद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)