महावितरणच्या तीन परिमंडलांचे खाजगीकरण

राज्य शासनाचा धक्‍कादायक निर्णय : कामगार आक्रमक

पुणे – पुनर्रचनेच्या नावाखाली महावितरणचे खासगीकरण करण्याचा घाट राज्य शासन आणि प्रशासनाने घातला आहे. या पुनर्रचनेच्या विरोधात कामगार संघटनांचे आंदोलन सुरू असतानाच मुंब्रा, शिव आणि कळवा या तीन परिमंडलांचे खाजगीकरण करण्याचा धक्कादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचे पत्र प्रशासनाने शुक्रवारी खासगी कंपन्यांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुनर्रचनेच्या नावाखाली खासगीकरण आणि मेगाकपात करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. या माध्यमातून राज्यभरातील किमान 20 ते 25 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांन घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. त्याविरोधात महावितरणमधील 5 कामगार संघटना एकत्रित आल्या असून त्यांनी कामगार कृती समितीची स्थापना केली आहे. त्यासंदर्भात आंदोलन सुरू असतानाच आणि कामगार संघटनांशी चर्चा सुरू असतानाच प्रशासनाने गुरूवारी अचानकपणे तीन परिमंडलांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाचा हा निर्णय अवसानघातकी असून त्यांची ही दंडेलशाही कदापीही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे झोनल सचिव ईश्‍वर वाबळे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)