महावितरणच्या अभियंत्यास मारहाण

संगमनेर: वीज जोडणी तोडल्याच्या कारणावरुन महावितरणच्या सहायक अभियंत्यास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.31) सकाळी संगमनेरमध्ये घडली.

आरोपीच्या अटकेसाठी सुरुवातीला पोलीस ठाण्यात ठिय्या देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत महावितरणचे कामकाज बंद केले.

केशव शेषराव जायभाये असे मारहाण झालेल्या सहायक अभियंत्याचे नाव असून ते सोमवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयात कामकाज करत असतांना त्यांच्या कार्यालयात इंदिरानगरमधील मिनाक्षी शांताराम घोडके, तनुज शांताराम घोडके यांच्यासह आणखी एक इसम आला होता. त्यांनी वीज जोडणी का तोडली याचा जायभाये यांना जाब विचारला. मात्र त्यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी जायभाये यांना मारहाण केली.

आपल्या अधिकाऱ्याला मारहाण होत असल्याचे बघून कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. मारहाण सुरु असतांना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारु अशी धमकी दिल्याचे जायभाये यांनी सांगितले. सहायक अभियंत्यास मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांनी महावितरणचे काम बंद करत पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुुरु केले, त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला. दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यामधील ठिय्या आंदोलन मागे घेत महावितरणच्या कार्यालयात आंदोलन सुरु केले असुन कामबंद आंदोलनदेखील सुरु केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)