महावितरणची यंत्रणा जुंपली कामाला

प्रभात वृत्तसेवा

पुणे; दि. 13- शहर आणि उपनगरांमध्ये सातत्याने खंडित होत असलेला वीजपुरवठा आणि महसूल वसूलीचा घसरत चाललेला आलेख याबाबत थेट प्रादेशिक संचालकांनीच कानऊघाडणी केल्याने महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच ताळयावर आले आहेत. पावसाळयाच्या काळात शहरातील वीजपुरवठा खंडित होउ नये यासाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणांची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे, तसेच महसूल वसूलीसाठी पुढील आठवड्यापासून खास मोहिम उघडण्यात येणार आहे.
पावसाळयाच्या कालावधीत नागरिकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा आणि अपघात घडू नयेत यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळयाच्या पूर्वी वीजयंत्रणांची तसेच वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येते, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र; हे वास्तव असतानाच गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने महावितरणची पायाभूत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. त्यामुळे शहर आणि उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता, काही भागात तर सोळा ते सतरा तासांहूनही अधिक काळ वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते, विशेष म्हणजे हे वास्तव असतानाच नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी फोन घेणेच टाळले होते, परिणामी त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत थेट प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे आणि पुणे परिमंडलाचे तत्कालीन मुख्य अभियंता मल्लेशा शिंदे यांना फोन करुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
त्याची गंभीर दखल घेऊन महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ताकसांडे यांनी या अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची चांगलीच कानऊघाडणी केली होती, त्यामुळे महावितरणची शहरातील संपूर्ण यंत्रणा आज कामाला लागली. त्यानुसार शहरातील वीजयंत्रणा आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे, त्याशिवाय महसूल वसूलीचा आलेख उंचाविण्यासाठी आगामी आठवड्यापासून खास मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती महावितरण मधील सूत्रांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.
—————


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)