महावितरणचा धोकादायक खांब काढा

मंचर- मंचर-पारगांव रस्त्यावर अवसरी खुर्द बसस्थानकानजीक धोकादायक वळणावर रस्त्याला लागून महावितरणचा सिमेंट खांब धोकादायक पद्धतीने उभा केल्याने अपघातात वाढ झाली आहे. महावितरण कंपनीने उभारलेला धोकादायक खांब त्वरीत काढूनन इतरत्र हलवावा, अशी मागणी ग्रामस्थांसह वाहनचालक करत आहे.
अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, टाव्हरेवाडी, गावडेवाडी या गावांना घरगुती ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा,म्हणून विद्युत वितरण कंपनीने मंचर येथे पॉवर हाऊसमधून मंचर-शिरूर रस्त्याच्या कडेने टाव्हरेवाडी फिडर योजनेअंतर्गत सिमेंट खांब उभारून टाव्हरेवाडी फिडर योजना चालू केल्याने अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, गावडेवाडी येथील ग्रामस्थांना सुरळीत विद्युत पुरवठा चालू आहे. मात्र अवसरी खुर्द गावच्या हद्दीत एसटी स्थानकापासून एक हजार फूट अंतरावर वळण रस्ता आहे. या वळण रस्त्याला लागून टाव्हरेवाडी फिडर योजनेचा खांब उभा आहे. या खांबाला आधार म्हणून दुसरा सिमेंटचा खांब आडवा आधार म्हणून दिला आहे. आडवा सिमेंटचा खांब वाहतुकीला अडथळा ठरत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना आडवा खांब लक्षात येत नसल्याने चारचाकी आणि दुचाकी या खांबाला धडकून अपघात झाले आहेत, त्यामुळे जीवितहानी होण्याअगोदर विद्युत वितरण कंपनीने धोकादायक वळणावरील सिमेंट खांब तातडीने काढून टाकावा, अशी मागणी वाहन चालक करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)