महावितरणकडून “आरटीआय’चा भंग

पिंपरी – महावितरण कंपनीकडे माहिती अधिकारात मागविलेली माहिती देण्यासंदर्भात गोपनीयता न पाळता अर्जदाराची माहिती ठेकेदाराला पुरविल्याचा आरोप विद्युत वितरण समिती सदस्य राहुल कोल्हटकर यांनी केला आहे. माहिती न देण्यासाठी या ठेकेदाराने धमकविल्याची तक्रार कोल्हटकर यांनी पोलिसांत दिली आहे. याशिवाय या प्रकाराला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामध्ये असलेल्या प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीच्या वीज जोडणीची कामे बेजबाबदारपणे केली असल्याची तक्रार कोल्हटकर यांनी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. तसेच या कामासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी महावितरणच्या आकुर्डी उपविभागीय कार्यालयाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज दिला होता. या अर्जानंतर या कामाबाबतची माहिती तयार असल्याचा फोन कोल्हटकर यांना बुधवारी (दि. 24) आकुर्डी कार्यालयातून आला. मात्र, चलन विभाग बंद असल्याने यादिवशी चलन न करता आल्याने ही माहिती मिळू शकली नाही. त्याच दिवशी रात्री साडे नऊच्या सुमारास गोरख अमराळे या ठेकेदाराने कोल्हटकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. याबाबत अमराळे यांना आकुर्डी उपविभागीय कार्यालयातील कवडे आणि अमित पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्याची बाब सांगितली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हटकर यांच्या तक्रारीनंतर मोशीतील प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीच्या वीज जोडणीच्या कामात फेरबदल करण्यात आले आहेत. ही माहिती उघड होऊ न देण्यासाठीच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत देखील ही माहिती उपलब्ध करुन दिली जात नसल्याचा आरोप कोल्हटकर यांनी केला आहे. याशिवाय कवडे व पाटील यांच्यावर देखील कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)