महालोक अदालतमध्ये 137 दावे निकाली

पिंपरी – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी न्यायालय तसेच आकुर्डी महापालिका न्यायालय येथे महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दाखल व दाखल पूर्व असे एकूण 137 दावे निकाली काढण्यात आले.

पिंपरी न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश के. एम. पिंगळे तर आकुर्डी न्यायालयामध्ये माधुरी खनवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अतिश लांडगे, अॅड. सुनील कड, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते.

अॅड. अतिश लांडगे यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, पक्षकारांना लोकन्यायालयामध्ये जास्तीत-जास्त प्रमाणात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढा, असे आवाहन करण्यात आले. अॅड. विलास कुटे यांनी देखील पक्षकार व वकिलांना मार्गदर्शन केले. अॅड. राजेश पुणेकर यांनी जास्तीत जास्त दावे निकाली काढण्यासाठी लोक अदालतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकन्यायालयामध्ये पिंपरी न्यायालयाचे 104 दाखल खटले निकाली लागले तर व 33 प्रिलीटिगेशन म्हणजेच दाखल पूर्व खटले निकाली निघाले. हे दावे 8 लाख एवढ्या रकमेचे होते तर प्रिलिटिगेशन म्हणजेच दाखलपूर्व 33 खटले निकाली निघाले. ते 4 लाख 63 हजार 269 रुपये एवढ्या रकमेचे होते.

अॅड. सुदाम साने, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. प्रदीप ढोले, अॅड. ज्ञानेश्वर होलगोली, अॅड. गणेश शिंदे, अॅड. प्रतिभा शिंदे, अॅड. सूरज खाडे, अॅड. अतुल अडसरे, अॅड. किरण पवार, अॅड. उमेश जाधव, अॅड. जॉर्ज डिसुजा आदी उपस्थित होते. पॅनल परीक्षक म्हणून अॅड. मोनिका गाढवे, अॅड. सुषमा वासने, अॅड. अंकुश गोयल, अॅड. अंतरा देशपांडे, अॅड. शिवाजी महानवर, अॅड. कुसूम पुलसे, अॅड. संगीता कुशालकर, अॅड. केशव घोगरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन अॅड. योगेश थंबा यांनी केले. अॅड. तुकाराम पडवळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)