महालोकअदालतीत 78 लाख 66 हजारांची वसुली

राजगुरूनगर- येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यालयात आयोजित महालोकअदालतीमध्ये 1 हजार 303 खटल्यांपैकी 68 खटले निकाली निघाले. या लोक अदालतमध्ये बॅंक थकीत रक्कम, धनादेश, विमा आणि कौंटुंबिक खटल्यात 78 लाख 66 हजार 286 रुपयांची वसुली झाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व उच्च न्यायालये व खंडपीठे, सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये, कौंटुंबिक न्यायालये यामध्ये राष्ट्रीय महालोकअदालतचे रविवारी (दि.22) आयोजन करण्यात आले होते. राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतचे उद्‌घाटन जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. बह्मे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहन्यायाधीश अतुल सलगर, पी. ए. साबळे, खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. जे. कोरे, वाय. जे. तांबोळी, एच. डी. देशिंगे, पी. डी. देवरे, सरकारी वकील ऍड. गिरीश कोबल, ऍड. रजनी नाईक, ऍड. सुमित्रा पाचारणे, ऍड. एस. ए. ठोकळ, राजगुरुनगर बार असोशिअशनचे अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, उपाध्यक्ष ऍड. वैभव कर्वे, ऍड. कृष्णा भोगडे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. पोपटराव तांबे, ऍड. बी. एम. सांडभोर, विधी सेवा प्राधिकरण समितीच्या सहाय्यक अधीक्षक सुनित्रा जोशी यांच्यासह बर असोशिएशनचे सर्व सदस्य, पक्षकार मोठ्या संखेने उपस्थित होते. महालोकादालतीत एकूण पाच पॅनेलमध्ये खटले चालले. पॅनेल जज म्हणून ऍड. प्रदीप उमाप, ऍड. सुहास दौंडकर, ऍड. देविदास शिंदे, ऍड.पवन कड, ऍड. मनीषा टाकळकर, ऍड. दिपाली वाळूंज, ऍड. रमेश गोकुळे, ऍड. सुनील चव्हाण, ऍड. सरिता काजळे, ऍड.ललित नवले यांनी काम पहिले. यावेळी न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी पक्षकार व वकिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप करंडे, सूत्रसंचालन वैभव कर्वे तर कृष्णा भोगडे यांनी आभार मानले.

  • त्यातील 5 खटल्यांमध्ये तडजोडी
    या महालोक अदालतमध्ये न्यालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी अशी 1 हजार 303 खटले ठेवण्यात आले होते. यामध्ये 68 खटले तडजोडीतून निकाली काढण्यात आले. बॅंक रिकव्हरी अंतर्गत 17 लाख 33 हजार, मोटार विमा पोटी 60 लाख 16 हजार तर कौटुंबिक खटल्यांपोटी 87 हजार 550 रुपये वसूल झाले आहेत. दाखलपूर्व 383 खटले लोकअदालतमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 5 खटले तडजोडीतून निकाली काढण्यात आले. यातून 27 हजार 786 रुपयांची वसुली झाली आहे. रविवारी झालेल्या लोकअदालत मध्ये 78 लाख 66 हजार 286 रुपयांची वसुली झाली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)