महालोकअदालतमध्ये राज्यात दावे तडजोडीत पुणे जिल्हा अव्वल

 जिल्ह्यात 37 हजार 312 दावे निकाली


राज्यात 1 लाख 38 हजार दाव्यांचे निराकारण


साताऱ्याचा दुसरा, तर रायगडाचा तिसरा क्रमांक

 

पुणे-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित महालोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुण्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात 79 हजार 312 दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 37 हजार 721 दावे निकाली काढण्यात आले.
शनिवारी (दि. 8 सप्टेंबर) राज्यात 34 जिल्ह्यांत महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यात एकूण 7 लाख 79 हजार 583 खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 38 हजार 64 दावे निकाली काढण्यात आले. त्यात सर्वाधिक दावे निकाली काढत पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकाविला. मागील काही कालावधीमध्ये दाखलपूर्व दावे निकाली काढण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात 1 लाख 16 हजार 923 दाखलपूर्व दावे निकाली काढण्यात आले आहेत. तर, उर्वरित 21 हजार 141 दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. पुणे जिल्ह्यात महालोकअदालतमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित स्वरूपाचे दिवाणी, फौजदारी दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढण्यात यश आले आहे. निकाली काढण्यात आलेल्या दाव्यातील तब्बल 35 हजार 447 दावे दाखलपूर्व आहेत. तर 2 हजार 274 दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यात 39 कोटी 40 लाख 93 हजार 258 रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली असल्याचे माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली. तर सातारा जिल्हाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेथे 1 लाख 17 हजार 721 पैकी 32 हजार 615 दावे निकाली निघाले. त्यापैकी 31 हजार 897 दावे दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित 718 प्रलंबित स्वरूपाचे आहेत. त्यानंतर तिसरा क्रमांक रागयड जिल्ह्याचा लागला आहे.
रायगडमध्ये 59 हजार 927 दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 14 हजार 114 दावे निकाली काढण्यात आले. त्यापैकी 13 हजार 766 खटले दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित 398 दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दर दोन महिन्यांनी महालोकअदालतचे आयोजन करण्यात येते. पुणे जिल्ह्यात दावे निकाली काढण्याबाबत नेहमी चांगली कामगिरी करत असतो. यापूर्वी दि. 14 जुलै रोजी झालेल्या लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी पुण्यात 65 हजार 147 दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 25 हजार 765 दावे निकाली काढून, 20 कोटी 35 लाख 83 हजार 683 रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)